Showing posts with label गर्जा मद्यराष्ट्र माझा...सूर्यकांत डोळसे यांचे विडंबन कविता. Show all posts
Showing posts with label गर्जा मद्यराष्ट्र माझा...सूर्यकांत डोळसे यांचे विडंबन कविता. Show all posts

Friday, January 28, 2022

गर्जा मद्यराष्ट्र माझा.... ​विडंबन कविता

॥ विडंबन कविता ॥

गर्जा मद्यराष्ट्र माझा....
जय जय मद्यराष्ट्र माझा,
गर्जा मद्यराष्ट्र माझा ......

द्राक्ष, काजू, मका, जांभूळ,
ज्वारी, बाजरी करवंदाची भरती अर्क,
मद्याच्या घागरी
भीमथडीच्या पट्ट्यांना या
गुळाचे पाणी पाजा ॥१॥

भीती न आम्हां तुझी मुळीही,
फसफसणाऱ्या गुळा
विदेशीच्या त्या मनमानीला,
जबाब देशी खुळा
दारिद्रयाचा सिंह गर्जतो,
कंट्री ब्रँड माझा
दऱ्या-खोऱ्यातून भट्ट्या लागल्या
माल मिळे ताजा ॥२॥

गळ्या गळ्यामध्ये विरली
दारूबंदीची गाणी
मद्यसम्राट खेळती,
खेळी जीवघेणी
धाब्या-धाब्यावरती पाजतो,
बापास पोरगा कुठे लाजतो?
परमीट रूमचे दार पूजतो,
ड्राय डेचेही तख्त फोडतो,
मद्यराष्ट्र माझा ॥३॥

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबा. ९९२३८४७२६९

(कविवर्य राजा बढे यांची क्षमा मागून)
३० एप्रिल २०१०

Sunday, December 27, 2009

बायको होता होता ती मेहूणीच झाली ......सूर्यकांत डोळसे यांचे विडंबन कविता,


ll विडंबन कविता ll

बायको होता होता ती मेहूणीच झाली ! 

बायको होता होता ती मेहूणीच झाली ! 
आता पुन्हा भविष्यांच्या पेटवा मशाली ! 

आम्ही नेमकी तिचीच आस का धरावी ? 
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ? 
कसा ’सूर्य’ शब्दांच्या वाहतो पखाली ! 


तीच घाव करिते फिरुनी ह्या जुन्या जखमावरी ; 
तोच दंश करिती आम्हा मनस्ताप हे विषारी ! 
आम्ही मात्र ऐकत असतो माहेरची खुशाली ! 

 तिजोर्‍यात केले हिने बंद जन्म साती, 
आम्हावरी संसारची पडे धूळमाती ! 
आम्ही ते दिवाने, ज्यांना पटली ना साली ! 

अशा कुठे अजून आम्ही गाडल्या उमेदी ? 
असा कसा जो तो येथे होतसे घरभेदी ? 
ह्या अपार दुःखाचीही चालली टवाळी ! 

उभा संसार झाला आता एक बंदीशाला 
जेंव्हा सालीचा घाणा बायकोस कळाला ! 
कशी मेहूणी दुर्दैवी अन्‌ बायको भाग्यशाली ! 

धुमसतात अजुनी विझल्या चित्ताचे निखारे !
अजुन स्वप्न जागत उठती उपट्सुंभ सारे !
आसवेच लग्नानंतर आम्हाला मिळाली ! 

बायको होता होता ती मेहूणीच झाली ! 
आता पुन्हा भविष्यांच्या पेटवा मशाली ! 

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

27 डिसेंबर 2009

(कविवर्य सुरेश भट यांची मन:पूर्वक माफी मागून)