Monday, February 22, 2010

असावा सुंदर कर्जाउ बंगला....सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता

असावा सुंदर कर्जाउ बंगला 

असावा सुंदर कर्जाउ बंगला 
फेडता फेडता फिटेल चांगला ॥धृ॥ 

हप्त्यावरच्या बंगल्याला हप्तेच फार 
नोटांच्या पुडक्यांनी फिटून जाईल पार ॥१॥ 

बोल बोल किती घ्यायचे एक की दोन? 
ज्याला ज्याला नाही त्याला विचारतो कोण? 
मनाच्या गच्चीवर मोर छानदार 
शेजारच्यांच्या अंगणात फुल्या लाल लाल ॥२॥ 

हप्त्यांच्याच्या बंगल्यामध्ये जो तो राहातो 
वसूलीला एजंट येता लपाछपी खेळतो 
मोठ्य मोठ्या हप्त्यांचा खेळ रंगला 
वसूलीच्या भितीपोटी जीव टांगला 
किती किती सुंदर भाड्याचाबंगला 
स्वस्त मस्त परवडता चांगला ॥३॥ 


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

 (राजा मंगळवेढेकर यांची माफी मागुन)

Sunday, February 14, 2010

या खुर्चीवर, या सत्तेवर, शतदा प्रेम करावे.....सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता


|| विडंबन कविता || 

या खुर्चीवर, या सत्तेवर, शतदा प्रेम करावे

या खुर्चीवर, या सत्तेवर, शतदा प्रेम करावे 
चंचल सारा, हे मतदारा, रूजली काळी नाती 
वाटून वाटून खावी तशी ही वाट्यास आली खाती 
खाते खादाड बघून कुणाचे, दातात ओठ धरावे. 
या खुर्चीवर, या सत्तेवर, शतदा प्रेम करावे


नोटांचा वाटूनिया खोका, सत्ता धारण केली 
बहूमताच्या काठावरती, नोटांचीच बोली पहा 
अपक्षांचे स्वाहा: सोहळे, येथे खिसे भरावे 
या खुर्चीवर, या सत्तेवर, शतदा प्रेम करावे

लाचारांच्या दाबल्या ओठांतून, हाक चोंबडी येते 
लोकशाहीवर प्रेम आमुचे, पुन्हा वदवून घेते 
सता आणि मत्तेसाठी, एकमेकांवर झुरावे
या खुर्चीवर, या सत्तेवर, शतदा प्रेम करावे

या नोटांनी जिंकून घेईन, हजारदा ही खाती 
अनंत मरणे वापरून घ्यावी, इथल्या व्होटींगसाठी 
इथल्या पेपरच्या पानावरती, अवघे जाहिरातावे 
या खुर्चीवर, या सत्तेवर, शतदा प्रेम करावे

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269


 (कविवर्य मंगेश पाडगावकर यांची माफी मागुन)

Monday, February 8, 2010

या भाई या.........सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता

||  विडंबन कविता || 


या भाई या...... 
 या भाई या, 
बघा बघा कशी माझी 
रूसली बया ll१ll 

ऐकू न घेते,
अद्वातद्वा कशी 
माझी ढम्मी बोलते ll२ll 

डोळे वटारीते, 
टका टका कसा 
माझा अंत बघते ll३ll 

बघा बघा तें, 
खदाखदा दात काढून 
कशी हसते ll४ll 

मला वाटते, 
हिला भाई काही 
काही न कळते ll५ll 

सदा भांडते, 
सदा हट्ट धरुनिया 
मागे पळते ll६ll 

 शहाणी कशी ?
भांडीकुंडी नावे ठेवि 
जशिच्या तशी ll७ll 


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269


 ( कविवर्य दत्तात्रय कोंडो घाटे यांची माफी मागून)

Monday, February 1, 2010

चुन्या चुन्या, तंबाखूत माझ्या........सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता

|| विडंबन || 

 चुन्या चुन्या, तंबाखूत माझ्या 

चुन्या चुन्या, तंबाखूत माझ्या 
तुलाच मी चोळुन खात आहे 
अजुन ही वाटते मला की 
तंबाखूवर तुझी रे मात आहे 

कळे ना मी चोळतो कुणाला 
कळे ना हा विडा कुणाचा ? 
पुन्हा पुन्हा त्रास होत आहे 
तुझे ठिकाण डबीत आहे 

चुन्या, तुला भेटतील माझे 
माझ्या दारी सूर ओळखीचे 
उभा माझ्या अंगणी पिंकाचा 
रंगला हा पारिजात आहे 

उगीच विड्यात तंबाखूची 
कशास केलीस चोळणी तू ? 
केलीस का बोंबाबोंब तु 
आमच्या जे ’मन’गटात आहे 

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

 ( कविवर्य सुरेश भट यांची क्षमा मागुन)