|| विडंबन कविता ||
या खुर्चीवर, या सत्तेवर, शतदा प्रेम करावे
या खुर्चीवर, या सत्तेवर, शतदा प्रेम करावे
चंचल सारा, हे मतदारा, रूजली काळी नाती
वाटून वाटून खावी तशी ही वाट्यास आली खाती
खाते खादाड बघून कुणाचे, दातात ओठ धरावे.
या खुर्चीवर, या सत्तेवर, शतदा प्रेम करावे
नोटांचा वाटूनिया खोका, सत्ता धारण केली
बहूमताच्या काठावरती, नोटांचीच बोली पहा
अपक्षांचे स्वाहा: सोहळे, येथे खिसे भरावे
या खुर्चीवर, या सत्तेवर, शतदा प्रेम करावे
लाचारांच्या दाबल्या ओठांतून, हाक चोंबडी येते
लोकशाहीवर प्रेम आमुचे, पुन्हा वदवून घेते
सता आणि मत्तेसाठी, एकमेकांवर झुरावे
या खुर्चीवर, या सत्तेवर, शतदा प्रेम करावे
या नोटांनी जिंकून घेईन, हजारदा ही खाती
अनंत मरणे वापरून घ्यावी, इथल्या व्होटींगसाठी
इथल्या पेपरच्या पानावरती, अवघे जाहिरातावे
या खुर्चीवर, या सत्तेवर, शतदा प्रेम करावे
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
(कविवर्य मंगेश पाडगावकर यांची माफी मागुन)