Tuesday, December 29, 2009

अतिरेकी पोसता पोसता काय गत झाली !

अतिरेकी पोसता पोसता काय गत झाली !

अतिरेकी पोसता पोसता काय गत झाली !
अरे, पुन्हा पाकिस्तानच्या मिटवा मशाली !

त्यांनी कश्मिरचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्यांचे वाट का पहावी ?
कसा पाक अमेरिकेच्या वाहतो पखाली !

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती हिरवे साप हे विषारी !
आम्ही आज ऐकत असतो त्यांचीच खुशाली !

धर्मात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हावरी अतिरेक्यांची पडे धूळमाती !
फुकट मेले अतिरेकी ज्यांच्या प्रेता ना वाली !

असे कसे पाकड्यांनी जोडले घरभेदी?
असे कसे पाकधार्जिने, येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दुःखातही जॅकेटची दलाली !

उभा पाक झाला आता एक बॉम्बशाला
जिथे बेनझीरचाही रंग त्यांना ना कळाला !
कसे भुत्तो दुर्दैवी अन्‌ बाकी भाग्यशाली !

धुमसतात अजुनी फेकल्या बॉम्बचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती धर्मांध सारे !
आसवेच अतिरेकाची पाकड्यांना मिळाली !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

(कविवर्य सुरेश भट यांची मन:पूर्वक माफी मागून)

Sunday, December 27, 2009

बायको होता होता ती मेहूणीच झाली ......सूर्यकांत डोळसे यांचे विडंबन कविता,


ll विडंबन कविता ll

बायको होता होता ती मेहूणीच झाली ! 

बायको होता होता ती मेहूणीच झाली ! 
आता पुन्हा भविष्यांच्या पेटवा मशाली ! 

आम्ही नेमकी तिचीच आस का धरावी ? 
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ? 
कसा ’सूर्य’ शब्दांच्या वाहतो पखाली ! 


तीच घाव करिते फिरुनी ह्या जुन्या जखमावरी ; 
तोच दंश करिती आम्हा मनस्ताप हे विषारी ! 
आम्ही मात्र ऐकत असतो माहेरची खुशाली ! 

 तिजोर्‍यात केले हिने बंद जन्म साती, 
आम्हावरी संसारची पडे धूळमाती ! 
आम्ही ते दिवाने, ज्यांना पटली ना साली ! 

अशा कुठे अजून आम्ही गाडल्या उमेदी ? 
असा कसा जो तो येथे होतसे घरभेदी ? 
ह्या अपार दुःखाचीही चालली टवाळी ! 

उभा संसार झाला आता एक बंदीशाला 
जेंव्हा सालीचा घाणा बायकोस कळाला ! 
कशी मेहूणी दुर्दैवी अन्‌ बायको भाग्यशाली ! 

धुमसतात अजुनी विझल्या चित्ताचे निखारे !
अजुन स्वप्न जागत उठती उपट्सुंभ सारे !
आसवेच लग्नानंतर आम्हाला मिळाली ! 

बायको होता होता ती मेहूणीच झाली ! 
आता पुन्हा भविष्यांच्या पेटवा मशाली ! 

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

27 डिसेंबर 2009

(कविवर्य सुरेश भट यांची मन:पूर्वक माफी मागून)

Monday, December 21, 2009

आनंदी आनंद गडे, दारूच दारू चोहिकडे.....सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता


 विडंबन कविता


आनंदी आनंद गडे, 
दारूच दारू चोहिकडे 

वरती खाली ग्लास भरे, 
चकण्यासंगे दारू घे रे 
ग्लासही भरला, 
दिशांत फिरला, चकणा चरला 
मोद विहरतो चोहिकडे ! 

ओले ओले क्षण सोनेरी हे, 
मदिरा ही हसते आहे 
खुलली संध्या फेसाने, 
आनंदे गाते गाणे 
बघ रंगले, मस्त दंगले, 
गान स्फुरले इकडे, तिकडे,
चोहिकडे! 

डोळ्यासमोर नक्षत्र कसे, 
डोकावुनि हे पाहतसे 
कुणास बघते ? पेगाला; पे
ग भेटला का त्याला ? 
ग्लासामधे तो, सदैव वसतो, 
सुखे विहरतो इकडे, तिकडे, 
चोहिकडे! 

ज्वारी,मका,बाजरी, 
बोलते सरकार स्वंये किती? 
गुळ मनोहर कूजती रे, 
मोहाला मोहतात बरे ? 
नयन आकसले, डोकेही गुंगले, 
डोलत वदले इकडे, तिकडे, 
चोहिकडे! 

दारूच्या या बाजारात, 
किती पेताड पितात ? 
त्यांना मोद कसा मिळतो, 
सोडुनि स्वार्था तो 
जातो द्वेष संपला, 
मत्सर गेला, 
आता उरला इकडे, तिकडे, 
चोहिकडे ....

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

(बालकविंची मन:पूर्वक क्षमा मागुन)

Monday, December 14, 2009

या नेत्यांनो........सूर्यकांत डोळसे यांचे विडंबन कविता,

विडंबन कविता


या नेत्यांनो... 

या नेत्यांनो, या रे या ! 
लवकर भरभर सारे या ! 
मजा करा रे, मजा मजा ! 
हेच दिवस तुमचे समजा. 

मस्त असे, जनता फसे; 
नवभूमी दाविन मी, 
त्या नगराला लागुनिया 
सुंदर ही दुसरी दुनिया. 

या नेत्यांनो! या रे या ! 
लवकर भरभर सारे या !
खळखळ थोडी करती खरे, 
लोक झोपले चहुंबाज बरे; 

जिकडे तिकडे माल मिळे, 
जनता विसरे, सगळे-सगळे. 
मत जयांचे, सोन्याचे पाजावे, 
माजावे. 
तर मग कामें टाकुनी या 
हवी बघाया ही दुनिया ! 
या नेत्यांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या ! 

उघडे दरवाजे चोरांना, 
लावुया चुना थोरांना, 
नोटा फडकिल्या घोड्यांना, 
मौज न दिसे ही वेड्यांना. च
पलगती, खाऊ किती ? 
हे खावे? ते खावे? 
तर हात लवकर धुवुनी या 
हवी बघाया ही दुनिया ! 
या नेत्यांनो, या रे या 
लवकर भरभर सारे या ! 


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269


 (कविवर्य भा.रा.तांबे यांची क्षमा मागुन)

Monday, December 7, 2009

घाल घाल पिंगा नार्‍या.......सूर्यकांत डोळसे यांचे विडंबन कविता,

|| विडंबन कविता ||


घाल घाल पिंगा नार्‍या...... 

घाल घाल पिंगा नार्‍य़ा, 
माझ्या परसात माघारी
जा, मिसकॉलची कर बरसात ! 
झक्कास आहे पोरगी,
सांग दोस्तांच्या कानात 

आई, बापापुढे आणि 
नको नको रे उन्हात ! 
विसरलास का रे तु, 
गॅदरींगला वर्ष झालं, 
बघून तुझा वेडेपणा,
माझ्या मनी हर्ष
आलं फिरुन-फिरुन सय येई, 
मोबाईल वाजतो 
पंजाबीच्या ओढणीचा शेव,
ओलाचिंब होतो. 

माझ्या शेजारची काळी नंदा 
खोडकर फार,
चिडवून चिडवून करी 
कशी,मला रे बेजार ! 
मनात तुझ्या 
आठवणीचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला 
येशील तू गडे ? 

कॅंटीनच्या चहावर 
मऊ दाट साय 
माया तुझ्यावर दाट,
तशी तुझी आहे काय? 
आले भरून डोळे 
पुन्हा मिसकॉल भेटला 
न झालेल्या भेटीसाठी 
जीव आट्ला आटला ! 


- सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड) 


 (कवीवर्य कृ.ब.निकुंब यांची माफी मागुन)