Monday, 14 December, 2009

या नेत्यांनो...

या नेत्यांनो...

या नेत्यांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !
मजा करा रे, मजा मजा !
हेच दिवस तुमचे समजा.
मस्त असे,
जनता फसे;
नवभूमी
दाविन मी,
त्या नगराला लागुनिया
सुंदर ही दुसरी दुनिया.
या नेत्यांनो! या रे या !
लवकर भरभर सारे या !

खळखळ थोडी करती खरे,
लोक झोपले चहुंबाज बरे;
जिकडे तिकडे माल मिळे,
जनता विसरे, सगळे-सगळे.
मत जयांचे,
सोन्याचे
पाजावे,
माजावे.
तर मग कामें टाकुनी या
हवी बघाया ही दुनिया !
या नेत्यांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !

उघडे दरवाजे चोरांना,
लावुया चुना थोरांना,
नोटा फडकिल्या घोड्यांना,
मौज न दिसे ही वेड्यांना.
चपलगती,
खाऊ किती ?
हे खावे?
ते खावे?
तर हात लवकर धुवुनी या
हवी बघाया ही दुनिया !
या नेत्यांनो, या रे या
लवकर भरभर सारे या !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

(कविवर्य भा.रा.तांबे यांची क्षमा मागुन)

No comments:

Post a Comment