Thursday, April 29, 2010

वाढे अंधाराचे जाळे



















वाढे अंधाराचे जाळे

वाढे अंधाराचे जाळे
लोड शेडींग शेडींग
घरा घरा्ला अंधाराचे
बघा बाशिंग बाशिंग.

लोक जागे झाले सारे
सार्‍या गल्ल्या जाग्या झाल्या
डा्स चावता लेकरां
संगे जागती माऊल्या
ऐका अनोखे आवाज
डास खुषींग खुशींग.

रोज फिरून दमली्‍
सार्‍या पंख्यांची पाती
सय जुनीच नव्याने्‍
आली ए.सीं.च्या ओठी
क्षणा-क्षणाला जाते
लायटींग लायटींग.

झाला आजचा प्रकाश
सदा काळॊख काळोख
वाढत्या विज बीला
युनिट्चा अभिषेक
सारे रोजचे तरीही
सारे सोशिंग सोशिंग.

इनव्हर्टरची झाली
झाली कशी दमछाक
कमी पडे जनरेटा
नसे कुणाचाच धाक
तुझ्या नसण्याची कळ
सारी चिटींग चिटींग.

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

(कविवर्य सुधीर मोघे यांची माफी मागुन)

Monday, April 26, 2010

आकाशी झेप घे रे, साखरा...सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता


आकाशी झेप घे रे, साखरा मोडी गरीबाच्या कंबरा... 

आकाशी झेप घे रे, साखरा 
मोडी गरीबाच्या कंबरा 

तुजभवती वैभव, राया चहा मधुर मिळतो प्याया 
चहालोलुप झाली काया हा कुठवर वेड्या, 
देसी घसरा कट कसला, 

हातर घॊट त्यालाच जाते पाचची नोट 
चहाचे बंधन व्याकूळ ओठ 
तुच आडवितो हा घराचा, 
उंबरा तुज पाय दिले रे त्याने 
कर विहार आडवाटेने काळा बाजारा,

रेशन,दुकाने जा ओलांडुन या गरीबा, 
पामरा नोटाविण तूर ना मिळते 
मज कळते, परि, ना वळते 
हृदयात व्यथा ही जळते 
महागाईने जीव होई बावरा 

बाजारातून मालही गायब 
त्यांना सामिल जो तो सायब 
मुख्य जसा तसाच नायब 
हा भोग जीवनी आला, लाजरा 

मोबाईल-.९९२३८४७२६९
 -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड) 

26 एप्रिल 2010

(कविवर्य जगदीश खेबूडकर यांची क्षमा मागुन)

Thursday, April 22, 2010

चेंडोबा चेंडोबा थकलास का ?

चेंडोबा चेंडोबा थकलास का ?

चेंडोबा चेंडोबा थकलास का ?
IPL च्या पैशामध्ये लपलास का ?
IPL चे झाड बेधुंदी,
क्रिकेटचा राडा बेबंदी !

कसोटी-वनडॆ वर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
चौकार षटकार खाशील का ?

कसोटी बिच्चारी रडत असेल,
वनडॆचा पारा चढत असेल !
असाच बसून पहाशील का ?
मालकांची बोलणी खाशील का ?

म्हातारे सगळे तरूण झाले,
फिटनेस-बिट्नेस करून आले.
त्यांच्याप्रमाणे तुही नाचशील का?
जादू की झप्पी घेशील का?

चेंडोबा,चेंडोबा कुठे रे गेला ?
ठोकता ठोकता गडप झाला !
चिअर्स गर्ल्सला समजून घेशील का?
टॅक्सवाल्यांना तोंड देशील का ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

(कविवर्य ग.दि.माडगूळकर यांची क्षमा मागुन)

Monday, April 12, 2010

शोधा ती बासरी, हरीची शोधा ती बा्सरी...सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता


|| विडंबन ||

 शोधा ती बासरी
 हरीची शोधा ती बासरी

 रंगात भंग तो, स्वररंग पाहण्या नजर भिरभिरते 
 ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची अडते 
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकु न येई....
 शोधा ती बासरी, हरीची शोधा ती बासरी! 

 हिरव्या हिरव्या रानात गाई-गुरे ही चरताना 
लपाछपीच्या खेळामध्ये गोप-गोपिकां धरताना 
हा आळवलेला सूर बासरीचा मनास खुलवून जाई 
हा उनाड वारा गुज बासरीचे कानी सांगून जाई 
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकु न येई....
 शोधा ती बासरी, हरीची शोधा ती बासरी! 

आज इथे या मरुतळी सूर वेणूचे जाणवती 
तुजसामोरी जाताना उगा लोचने पाणवती 
हे सत्य असे की स्वप्न म्हणावे जो तो हरखून जाई 
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी शोधीत तिजला राही 
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकु न येई....
शोधा तीबासरी, हरीची शोधा ती बासरी! 

 --सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-.९९२३८४७२६९


 (कविवर्य अशोक परांजपे यांची माफी मागुन)

Monday, April 5, 2010

या वीजेने या कविला दान द्यावे..सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता

| विडंबन कविता || 


या वीजेने या कविला दान द्यावे 

या वीजेने या कविला दान द्यावे 
या वीजेने या कविला दान द्यावे 
थकले बील तरी समजून घ्यावे. 

कोणती पुण्ये अशी येती फळाला? 
वीजेचे कनेक्शनच तोडून जावे. 
 या वीजेने या कविला दान द्यावे 
आणि माजी आमदारास सुख व्हावे. 

का मागती दादा माफी माझी ? 
आली संधी तर मी भांडून घ्यावे. 
नको म्हणता,का भरले बील माझे? 
जनता सामान्य,मग आम्ही कसे राजे? 

मी असा आनंदुन बेहोष होता 
हे ’गांधारी’,तु डोळे खोलुन पहावे. \

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड) 

 (कविवर्य ना.धों.महानोर यांची माफी मागुन)

|