Monday, 12 April, 2010

शोधा ती बा्सरी, हरीची शोधा ती बा्सरी

|| विडंबन ||

शोधा ती बा्सरी, हरीची शोधा ती बा्सरी


रंगात भंग तो, स्वररंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची अडते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकु न येई -
शोधा ती बा्सरी, हरीची शोधा ती बा्सरी!

हिरव्या हिरव्या रानात गाई-गुरे ही चरताना
लपाछपीच्या खेळामध्ये गोप-गोपिकां धरताना
हा आळवलेला सूर बासरीचा मनास खुलवून जाई
हा उनाड वारा गुज बासरीचे कानी सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकु न येई -
शोधा ती बा्सरी, हरीची शोधा ती बा्सरी!

आज इथे या मरुतळी सूर वेणूचे जाणवती
तुजसामोरी जाताना उगा लोचने पाणवती
हे सत्य असे की स्वप्न म्हणावे जो तो हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी शोधीत तिजला राही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकु न येई -
शोधा ती बा्सरी, हरीची शोधा ती बा्सरी!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

(कविवर्य अशोक परांजपे यांची माफी मागुन)

No comments:

Post a Comment