Showing posts with label हरीची शोधा ती बा्सरी. Show all posts
Showing posts with label हरीची शोधा ती बा्सरी. Show all posts

Monday, April 12, 2010

शोधा ती बासरी, हरीची शोधा ती बा्सरी...सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता


|| विडंबन ||

 शोधा ती बासरी
 हरीची शोधा ती बासरी

 रंगात भंग तो, स्वररंग पाहण्या नजर भिरभिरते 
 ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची अडते 
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकु न येई....
 शोधा ती बासरी, हरीची शोधा ती बासरी! 

 हिरव्या हिरव्या रानात गाई-गुरे ही चरताना 
लपाछपीच्या खेळामध्ये गोप-गोपिकां धरताना 
हा आळवलेला सूर बासरीचा मनास खुलवून जाई 
हा उनाड वारा गुज बासरीचे कानी सांगून जाई 
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकु न येई....
 शोधा ती बासरी, हरीची शोधा ती बासरी! 

आज इथे या मरुतळी सूर वेणूचे जाणवती 
तुजसामोरी जाताना उगा लोचने पाणवती 
हे सत्य असे की स्वप्न म्हणावे जो तो हरखून जाई 
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी शोधीत तिजला राही 
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकु न येई....
शोधा तीबासरी, हरीची शोधा ती बासरी! 

 --सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-.९९२३८४७२६९


 (कविवर्य अशोक परांजपे यांची माफी मागुन)