Showing posts with label आनंदी आनंद गडे. Show all posts
Showing posts with label आनंदी आनंद गडे. Show all posts
Friday, May 24, 2019
आनंदी आनंद गडे !..सूर्यकांत डोळसेयांची विडंबन कविता
आनंदी आनंद गडे !
इकडे तिकडे चोहिंकडे
वरती खाली मोदी भरे, शहासंगे मोदी फिरे;
उरात भरला, देशांत उरला, जगांत फिरला,
मोदी बहर हा चोहिकडे...... आनंदी आनंद गडे !
बहुमतही त्रिशतकी हे, कमळही हसते आहे,
खुलली आघाडी जोमाने, आनंदे गाते गाणे;
वाघ रंगले, चित्ते दंगले, गान स्फुरले,
इकडे तिकडे चोहिकडे..... आनंदी आनंद गडे !
ईव्हीएमकडे विरोधक कसे, डोकावुनी हे पाहातसे;
कुणास बघते?हॅकरला?हॅकरला भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव असतो का?
रडके-पडके-चिडके
इकडे तिकडे चोहिकडे..... आनंदी आनंद गडे !
वाहती लहरी धुंदगती, कोलती सुनामी पक्षतटि,
पक्ष मनोहर कुजित रे,कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भक्तही गुंगले, डोलत वदले,
इकडे तिकड, चोहिकडे...... आनंदी आनंद गडे !
सत्तेच्या बाजारांत, किती पामरे पडतात,
त्यांना मोदी कसा मिळतो,
सोडुनी स्वार्था तो जातो हिमालया,
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला राष्ट्रवाद
इकडे तिकडे चोहिकडे..... आनंदी आनंद गडे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबा.९९२३८४७२६९
Monday, December 21, 2009
आनंदी आनंद गडे, दारूच दारू चोहिकडे.....सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता
विडंबन कविता
दारूच दारू चोहिकडे
वरती खाली ग्लास भरे,
चकण्यासंगे दारू घे रे
ग्लासही भरला,
दिशांत फिरला, चकणा चरला
मोद विहरतो चोहिकडे !
ओले ओले क्षण सोनेरी हे,
मदिरा ही हसते आहे
खुलली संध्या फेसाने,
आनंदे गाते गाणे
बघ रंगले, मस्त दंगले,
गान स्फुरले इकडे, तिकडे,
चोहिकडे!
डोळ्यासमोर नक्षत्र कसे,
डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते ? पेगाला; पे
ग भेटला का त्याला ?
ग्लासामधे तो, सदैव वसतो,
सुखे विहरतो इकडे, तिकडे,
चोहिकडे!
ज्वारी,मका,बाजरी,
बोलते सरकार स्वंये किती?
गुळ मनोहर कूजती रे,
मोहाला मोहतात बरे ?
नयन आकसले, डोकेही गुंगले,
डोलत वदले इकडे, तिकडे,
चोहिकडे!
दारूच्या या बाजारात,
किती पेताड पितात ?
त्यांना मोद कसा मिळतो,
सोडुनि स्वार्था तो
जातो द्वेष संपला,
मत्सर गेला,
आता उरला इकडे, तिकडे,
चोहिकडे ....
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
(बालकविंची मन:पूर्वक क्षमा मागुन)
Labels:
आनंदी आनंद गडे,
दारूच दारू चोहिकडे
Subscribe to:
Posts (Atom)