Monday, 8 February, 2010

या भाई या......

|| विडंबन ||

या भाई या......

या भाई या,
बघा बघा कशी माझी रूसली बया ll१ll

ऐकू न घेते,
अद्वातद्वा कशी माझी ढम्मी बोलते ll२ll

डोळे वटारीते,
टका टका कसा माझा अंत बघते ll३ll

बघा बघा तें,
खदाखदा दात काढून कशी हसते ll४ll

मला वाटते,
हिला भाई काही काही न कळते ll५ll

सदा भांडते,
सदा हट्ट धरुनिया मागे पळते ll६ll

शहाणी कशी ?
भांडीकुंडी नावे ठेवि जशिच्या तशी ll७ll

- सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

( कविवर्य दत्तात्रय कोंडो घाटे यांची माफी मागून)

1 comment:

  1. mala tumcha blog avadla. tumi charolya che book prakashit kele pahije.

    ReplyDelete