Showing posts with label गाणार्‍याने गात जावे...सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता. Show all posts
Showing posts with label गाणार्‍याने गात जावे...सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता. Show all posts

Tuesday, March 16, 2010

गाणार्‍याने गात जावे...सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता

गाणार्‍याने गात जावे 

गाणार्‍याने गात जावे 
ऐकणार्‍याने ऐकत जावे 
उकांड्यावरच्या गाढवाकडून 
खिंकाळणार्‍या घोड्याकडून 
गाण्यासाठी चाल घ्यावी. 

असो अग्रलेख वा निबंध 
त्याला गाण्याची चाल द्यावी. 
वेड्यापिशा शैलीत गाताना 
वेडेपिसा अभिनय करावा. 
पतंग ओढता ओढता 
तबलजीचा हात धरावा. 
तर्ररsss झालेल्या गुरूकडून
झिंगणारी शैली घ्यावी. 

तृप्त झालेल्या रसिकांकडून 
बिदागीची थैली घ्यावी. 
गायनाचा हिमालय नको, 
गाणार्‍याने सखल व्हावे. 
शेकडो झाले रिऍलिटी शो 
पटकन त्यात दाखल व्हावे. 

गाणार्‍याने गात जावे 
गाणार्‍याचे खळे व्हावे. 
ऐकता ऐकता एक दिवस 
गाणा-यांचे गळे घ्यावे. 

 -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269


 (विंदा करंदीकर यांची माफी मागुन)