Showing posts with label झाकण्यापुरता कपडा पाहिजे ..सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता. Show all posts
Showing posts with label झाकण्यापुरता कपडा पाहिजे ..सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता. Show all posts

Sunday, March 28, 2010

झाकण्यापुरता कपडा पाहिजे नको टोचाया चोळी..सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता


 विडंबन कविता


झाकण्यापुरता कपडा पाहिजे 
नको टोचाया चोळी 

झाकण्यापुरता कपडा पाहिजे 
नको टोचाया चोळी 
बघणार्‍याचे डोळे हजारो 
मी तर त्यांना जाळी. 

हवा तितका पाडी पाऊस 
डायरेक्टर वेळोवेळी 
सीनपुरता नेतो आंम्हा 
वाहत्या धबधब्याखाली. 

एक वीतिच्या भागास पुरते 
तळ हाताची खेळी 
बघणार्‍याचे डोळे हजारो 
मी तर त्यांना जाळी. 

साड्या-बिड्या नकोत आता 
एक ब्रेक दे राया 
गरजेपुरती देई वसने 
दर्शन घडण्या काया . 

चापून-चोपून नको बसाया 
नको कुणाची टाळी. 
बघणार्‍याचे डोळे हजारो 
मी तर त्यांना जाळी. 

आहे तितुके दाखवयाचा 
हट्ट असे गा माझा 
घणार्‍याचे निवतील डोळे 
रंक असो वा राजा. 
नागवेपण हि ना लगे,...
ना लागे पस्तावाची पाळी 

बघणार्‍याचे डोळे हजारो 
मी तर त्यांना जाळी. 

 -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269


 (कविवर्य नारायण सुर्वे यांची माफी मागुन)