Monday, 18 January, 2010

प्रेमाच्या या खेळा मधली नान्या आणिक नानी....

|| विडंबन ||

प्रेमाच्या या खेळा मधली नान्या आणिक नानी....

प्रेमाच्या या खेळा मधली नान्या आणिक नानी
अर्ध्यावरती डाव मोडते, माधुरी एक शहाणी ॥धृ॥

नान्या वदला , "मला समजली तुझी कड्वट भाषा
माझ्या गालासोबत बोलती, तुझ्या हातच्या रेषा ''
कां नानी च्या डोळा तेव्हा, खळकुणी आले पाणी ? ॥१॥

नानी वदली बघत एकटक खांबावरच्या तारा
"उद्या पहाते दुसर्‍या वाटा, दुज्या गावच्या पोरा"
पण नान्याला उशिरा कळली गूढ अल्ल्ड ही नानी ॥२॥

तिला विचारी नान्या,"कां हे जीव असे जोडावे ?
कां माधुरीने फुलण्याआधी फूल असे तोडावे ?''
या प्रश्नाला उत्तर नव्हते,नानी केवलवाणी ॥३॥

कां मांजरीने मिटले डोळे दुध-दुध पिताना ?
कां बोक्याचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना ?
नान्यावरती झुरुन गेली एक माधुरी शहाणी ॥४॥

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

(कविवर्य मंगेश पाडगावकर यांची मन:पूर्वक माफी मागुन)

No comments:

Post a Comment