Thursday, 28 January, 2010

अरे ब्लॉकमधी ब्लॉक

अरे ब्लॉकमधी ब्लॉक

अरे ब्लॉकमधी ब्लॉक
त्या दोघांचा चांगला
देखा मुलांसाठी त्यांनं
जीव पासबुकी टांगला

मुलं निजली ब्लॉकात
जसा एकटा बंगला
त्यांचा ऑफिसात जीव
जीव कामाले टांगला

ब्लॉकवाले ब्लॉकवाले
असे कसे रे चतुर
फक्त टॉवरचे सांगाती
कसे सदा बंद रे दार?

ब्लॉक घेतला घेतला
जसा सर्वांहून खासा
पैशांची ही कारागिरी
जरा जोख रे मानसा

त्यांचा उलू्साच ब्लॉक
खाती दात, बंद ओठ
तुम्हां देले रे शहरानं
वागणं अन जगणं खोटं

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

Post a Comment