Monday, 8 March, 2010

मराठीच्या खांद्यावर हिंदीचे ओझे

|| विडंबन ||

मराठीच्या खांद्यावर हिंदीचे ओझे

कशासाठी उतरावे बांबू घेऊन ?
कोण बोले कोणासाठी फक्त घोकून
बघतात येथे कुणी मनात लाजून
तरी कसे झुलतात मावळे हे राजे ?

लोक सारे गेले येथे विरुन विझून
भाषा जाई हिंदीत गोठून झडून
अमृताशी घेई पैजा चूकून माकून ?
म्हणती हे वेडे परी कुणी न लाजे

संथ झाली लढ्या आधी मनाची व्याधी
अस्मितेची गाणी म्हणजे डरकाळी साधी
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
१०५ जणांचे हौतात्म्य अजूनही ताजे

- सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

( आरती प्रभू यांची माफी मागुन )

No comments:

Post a Comment