विडंबन कविता
--------------------
(हे गीत कोण कुणाला म्हणते आहे? किंवा म्हणू शकते?... तुम्ही स्वतःच्या कल्पनेने कल्पना करून या गीताचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती)
सरकारची ही घडी अशीच राहू दे
सरकारची ही घडी अशीच राहू दे
कमलाच्या फुलावरी धनुष्य नाचू दे
सरकारची ही घडी अशीच राहू दे
रंगविले मी मनात डाव देखणे,
रंगविले मी मनात डाव देखणे,
आवडले आघाडीला बोटावर खेळविणे,
स्वप्नातील पद ते...
स्वप्नातील पद ते पुन्हा लाभू दे
सरकारची ही घडी अशीच राहू दे
हळुच लोक फोडण्याचा छंद आगळा
हळुच लोक फोडण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविण का...
लज्जेचा त्याविण का अर्थ वेगळा
सत्तेच्या स्पर्शातुन अंग अंग धुंद होऊ दे
सरकारची ही घडी अशीच राहू दे
पाहु दे असेच तुला दाढीत हासता
जाऊ दे असाच काळ शब्द झेलता
खरडू दे ताशेरे,सुप्रीम कोर्ट धन्य होऊ दे
सरकारची ही घडी अशीच राहू दे
सरकारची ही घडी अशीच राहू दे
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबा.9923847269
(कविवर्य यशवंत देव यांची क्षमा मागून)