Thursday, 26 November, 2009

झुक झुक झुक झुक आगीनगाडी

झुक झुक झुक झुक आगीनगाडी


झुक झुक झुक झुक आगीनगाडी
झुक झुक झुक झुक आगीनगाडी
बोटांच्या रेषा कानामागे काढी
पळते सैनिक पाहूया,काकाच्या गावाला जाऊया

काकाचा गाव मोठा,तिकीटासाठी मोजा नोटा
शोभा पाहुनी घेऊया, काकाच्या गावाला जाऊया

काकाचा पोरगा फोटोग्राफर,म्हणेल कुठले हे लोफर?
फोटो काढून घेऊया,काकाच्या गावाला जाऊया.

त्याचा पी.ए.सुगरण,रोज रोज नवे प्रकरण
मिलिंद मिलिंद गाऊया, काकाच्या गावाला जाऊया

काका मोठा चित्रकार,व्यंग काढी बहारदार
अग्रलेख नावे ठोकूया,काकाच्या गावाला जाऊया

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

Post a Comment