Monday, 30 November, 2009

माझ्या गोव्याच्या पुडीत

माझ्या गोव्याच्या पुडीत

माझ्या गोव्याच्या पुडीत
गड्या गरळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
दात फ़ुटती दुधाचे.

माझ्या गोव्याच्या पुडीत
चुन्या-तंबाखू रास,
फो्डी तोंडाला पाझर
आजूबाजुला सुवास.

माझ्या गोव्याच्या पुडीत
लाल रंगाचीकारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
दिसेल त्या भिंतीवरी.

माझ्या गोव्याच्या पुडीत
असा आहे भपकारा
गुटख्याची थुंकीचा
रात्रंदिवस रे मारा.

माझ्या गोव्याच्या पुडीत
येते गोंदणे घरा,
ओलावल्या पिंकांनी
काढतो रांगोळी दारा.

माझ्या गोव्याच्या पुडीत
त्यांनी काय काय घातले?
चार हजार रसायणे
त्यांनी त्यात हो ओतले.

माझ्या गोव्याच्या पुडीत
असे गळ्याचा रे घात,
वाढी दोस्तीच्या मायेने
माझ्या दोस्ताचा रे हात.

माझ्या गोव्याच्या पुडीत
निकोटीनचीच चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
कर्क रोगाचीच नांदी.

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

Post a Comment