Sunday, December 27, 2009

बायको होता होता ती मेहूणीच झाली ......सूर्यकांत डोळसे यांचे विडंबन कविता,


ll विडंबन कविता ll

बायको होता होता ती मेहूणीच झाली ! 

बायको होता होता ती मेहूणीच झाली ! 
आता पुन्हा भविष्यांच्या पेटवा मशाली ! 

आम्ही नेमकी तिचीच आस का धरावी ? 
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ? 
कसा ’सूर्य’ शब्दांच्या वाहतो पखाली ! 


तीच घाव करिते फिरुनी ह्या जुन्या जखमावरी ; 
तोच दंश करिती आम्हा मनस्ताप हे विषारी ! 
आम्ही मात्र ऐकत असतो माहेरची खुशाली ! 

 तिजोर्‍यात केले हिने बंद जन्म साती, 
आम्हावरी संसारची पडे धूळमाती ! 
आम्ही ते दिवाने, ज्यांना पटली ना साली ! 

अशा कुठे अजून आम्ही गाडल्या उमेदी ? 
असा कसा जो तो येथे होतसे घरभेदी ? 
ह्या अपार दुःखाचीही चालली टवाळी ! 

उभा संसार झाला आता एक बंदीशाला 
जेंव्हा सालीचा घाणा बायकोस कळाला ! 
कशी मेहूणी दुर्दैवी अन्‌ बायको भाग्यशाली ! 

धुमसतात अजुनी विझल्या चित्ताचे निखारे !
अजुन स्वप्न जागत उठती उपट्सुंभ सारे !
आसवेच लग्नानंतर आम्हाला मिळाली ! 

बायको होता होता ती मेहूणीच झाली ! 
आता पुन्हा भविष्यांच्या पेटवा मशाली ! 

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

27 डिसेंबर 2009

(कविवर्य सुरेश भट यांची मन:पूर्वक माफी मागून)

1 comment:

  1. GAMATISHIR KAVITA AAHE,,,,,, EK TARI MEHUNI AASAVICH MANSALA TYASHIAVAY MAJA NAHI

    ReplyDelete